“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट कसं चालतं?” – उद्धव ठाकरे

क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सवाल

“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट कसं चालतं?” उद्धव ठाकरेंचा संताप

दादर-शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशाचे

सैनिक शहीद झाले, नागरिकांचे जीव गेले, कुटुंब उद्ध्वस्त झाली, तेव्हा देशभरात माणुसकीचा आवाज उठला नाही, मग क्रिकेटसाठी मात्र पाकिस्तानसोबत

तुम्ही मैदानात उतरण्याची परवानगी कशी देता? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“कबूतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तीणीसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात, ही चांगली गोष्ट आहे, माणुसकी हवीच. पण पहलगामच्या हल्ल्यात

सैनिक शहीद झाले, निष्पाप नागरिक मारले गेले, त्या वेळी ही माणुसकी कुठे गेली होती? पंतप्रधान म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग

रक्त आणि क्रिकेट कसं चालतं? गरम सिंदूराचं आता कोल्ड्रिंक झालं का?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

ठाकरे म्हणाले, “देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांचा त्याग लक्षात न घेता, पाकिस्तानसोबत सामना खेळायचा निर्णय हा देशद्रोहासमान आहे. देशापेक्षा जय

शाह मोठा आहे का? देशापेक्षा क्रिकेट बोर्डाचा पैसा मोठा आहे का? सैनिक शहीद झाले, नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तरी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा

निर्णय तुम्ही घेतलात, हे देशाच्या जखमेवर मीठ चोळणं आहे.”

“ऑपरेशन सिंदूरबाबत जगभर शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तानविरोधात सहानुभूती मागितली, पण एकही देश आपल्या पाठीशी उभा राहिला नाही. आता त्याच

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहात. मग पुन्हा नवं शिष्टमंडळ पाठवणार का? हे काय जनतेची थट्टा आहे?” असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

“सोफिया कुरेशी यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी शौर्य गाजवलं, पण भाजपचेच नेते त्यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणतात आणि तरीही ते मंत्रीपदावर

बसले आहेत. देशभक्तीचं थोतांड गाताना या लोकांना लाज वाटत नाही,” असे टोले उद्धव ठाकरेंनी लगावले.

शेवटी ठाकरे म्हणाले, “खेळ महत्वाचा आहे, पण देश त्याहून मोठा आहे. दुर्दैवाने भाजपने देशाला जय शहाच्या हातात ठेवून टाकलं आहे.

रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालू शकतं? हेच आज देशाचं मोठं दुर्दैव आहे.”

Read also : https://ajinkyabharat.com/congress-aamdar-online-betting-case-caught/