देवरीत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला वृषभ राजाचा विवाह सोहळा
शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून ओळखला जाणारा बैल म्हणजेच वृषभ राजा. पोळ्याच्या निमित्ताने देवरी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वृषभ राजाचा विवाह सोहळा पार पाडला.
आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी परंपरा जपण्यासाठी वृषभ राजाचा विवाह सोहळा गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला.
देवरी गावात गायकवाड परिवाराच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा पार पडतो. त्यानंतर वाघोडे परिवाराकडून हाच सोहळा पार पाडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली जाते.
गावकरी आपल्या बैलजोडीला सजवून धजवून पोळ्याच्या तोरणाखाली उभे करतात, भगवान शंकराचे स्मरण करून महादेवाचे गाणे गात उत्सवाचा आनंद घेतात.
शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पराठे पाण्याखाली गेले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तरीसुद्धा ‘आपल्या वृषभ राजाला नाराज करायचे नाही’ या भावनेतून ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात पोळ्याचा सण साजरा केला.
गावातील प्रत्येक पारंपरिक कार्यक्रमाप्रमाणे याही सोहळ्यात गावकऱ्यांची एकता दिसून आली. अडचणींच्या काळातही गावच्या परंपरा व
संस्कृती जपत देवरीकरांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण जपले आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/akotamadhyay-sarvadharmabhawacha-message/