भारताची आत्मनिर्भरता वाढवेल रॅम्पेज मिसाईल

रॅम्पेज मिसाईल

भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये कामगिरी बजावलेल्या रॅम्पेज मिसाईलसाठी इस्राईलकडून मेगा ऑर्डर दिली

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची कामगिरी बजावलेल्या रॅम्पेज मिसाईलसाठी भारतीय वायूसेनेने इस्राईलकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्याची तयारी सुरू केली आहे.

ही मिसाईल 2020-21 मध्ये गलवान चकमकीनंतर चीनसह निर्माण झालेल्या तणावाच्या काळात आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खरेदी करण्यात आली होती.

भारतीय वायूसेना आता आपल्या हवाई ताकदीत आणखी वाढ करण्यासाठी रॅम्पेज मिसाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या तयारीत आहे.

संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारतीय वायूसेनेत या मिसाईलला HSLD Mk-II नावाने ओळखले जाते.

ही मिसाईल सु-30 MKI, मिग-29, जग्वार आणि मिग-29K सारख्या फायटर जेटमध्ये इंटीग्रेट केली गेली आहे.

रॅम्पेज मिसाईल एक अत्याधुनिक हवेतून जमीनीवर हल्ला करणारी सुपरसॉनिक मिसाईल आहे. तिचा वेग मॅक-2 इतका आहे, म्हणजे ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडू शकते.

INS/GPS नेव्हिगेशन प्रणाली आणि इलेक्ट्रो-ऑप्टीकल/इन्फ्रारेड सेंसरच्या मदतीने ही मिसाईल अत्यंत अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे.

रॅम्पेज मिसाईल बंकर, रडार स्टेशन, कमांड सेंटर आणि अन्य मजबूत लक्ष्य नष्ट करण्यासाठी तयार केली गेली आहे.

भारतीय वायूसेनेत ही मिसाईल विविध लढाऊ विमानांमध्ये इंटीग्रेट करण्यात आली आहे.

सु-30 MKI हे भारताचे सर्वात ताकदवान लढाऊ विमान असून त्यामध्ये ब्रह्मोज आणि रॅम्पेज मिसाईल दोन्ही वापरता येतात.

मिग-29 हे हलके आणि चपळ विमान आता रॅम्पेज मिसाईलसह अधिक घातक झाले आहे. जग्वार हे जुने पण विश्वासार्ह विमान असून त्यामध्ये रॅम्पेज मिसाईलने अपग्रेड केले आहे.

मिग-29K हे भारतीय नौसेनेच्या विमानवाहू नौकांवर तैनात असून त्यामध्येही रॅम्पेज मिसाईल लावली जाणार आहे.

वायूसेना पुढील टप्प्यात तेजससारख्या इतर विमानांवरही रॅम्पेज मिसाईल इंटीग्रेट करण्याचा विचार करत आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये रॅम्पेज मिसाईलच्या यशस्वी कामगिरीनंतर भारतीय वायूसेना मोठ्या प्रमाणावर त्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

ही ऑर्डर फास्ट ट्रॅक ऑर्डर अंतर्गत देण्यात येणार आहे. वायूसेना मेक इन इंडियाच्या अंतर्गत रॅम्पेज मिसाईल भारतात तयार करण्याचे प्रयत्न करत आहे.

इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्यात 2023 मध्ये एअरो इंडियाच्या माध्यमातून करार झाला होता,

ज्याद्वारे भारतात रॅम्पेजचे उत्पादन शक्य होईल. यामुळे कमी भांडवल खर्च येईल आणि भारताची आत्मनिर्भरता वाढेल.

या मिसाईलमुळे भारतीय वायूसेनेची सामर्थ्य वाढेल, सीमारेषेवरील धोके हाताळण्याची क्षमता मजबूत होईल आणि भविष्यातील युद्धतयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी ठरेल.

Read also : https://ajinkyabharat.com/long-trunk-and-sajid-pathan-junya-mode/