मोठी बातमी! शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांची PM मोदींसोबत भेट

मोठी भेट! खासदार अमर काळे दिल्ली दरबारात

नवी दिल्ली – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.  या

भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले अमर काळे यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी पंतप्रधानांची भेट

घेतल्याची माहिती दिली आहे.अमर काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित

करण्याच्या व रोजगाराला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या (MGIRI) सर्वांगीण विकासाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काळे यांनी एक धक्कादायक दावा केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही लोकांनी त्यांच्याकडे येऊन,

मोठ्या रकमेच्या बदल्यात निवडणूक जिंकून आणण्याची ऑफर दिल्याचे ते म्हणाले होते.मोदींसोबतची भेट केवळ विकासाच्या कामांपुरतीच मर्यादित आहे की यामागे काही राजकीय

समीकरणं दडली आहेत, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/taki-bu-yehe-poa-excitement/