बाळापूर : पंचायत समिती बाळापूर येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांची बदली होऊन त्यांची
नियुक्ती पंचायत समिती मूर्तीजापूर येथे करण्यात आली आहे.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचाऱ्यांबरोबर तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सांभाळून घेत कर्तव्यदक्षपणे काम केले, अशी प्रशंसा निरोप समारंभात करण्यात आली.
दरम्यान, २० ऑगस्ट रोजी कृषी विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना निरोप देण्यात आला.
यावेळी नवनियुक्त गटविकास अधिकारी बी. पी. पजई यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विस्तार अधिकारी दिग्विजय चव्हाण, पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी व तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फेही पजई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी विनोद काळे, सहाय्यक लेखा अधिकारी , स्वप्नील गरुड, विस्तार अधिकारी (पंचायत), दिग्विजय चव्हाण, गंगाधर
गुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल उंदरे यांनी केले तर संघटनेचे अध्यक्ष सुधीर काळे यांनी मार्गदर्शन केले.
Read also : https://ajinkyabharat.com/balaji-english-shache-talukat-ghavaghavit-yash/