अकोला रेल्वे स्थानकावर अपघात :

अकोला

 पोलिसांच्या तत्परतेमुळे युवकाचा जीव वाचला

अकोला : अकोट येथील रमाबाई आंबेडकर नगरातील 36 वर्षीय जितू प्रमोद तेलगोटे हा युवक अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील दादऱ्याच्या पायऱ्यांवरून उतरताना पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी सुमारास तीन वाजता घडली.

पडताना त्याच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

मात्र, घटनास्थळी उपस्थित जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, युवक प्लॅटफॉर्मवर नेमका कशासाठी आला होता आणि त्याचा तोल कसा गेला याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तातडीच्या दखलीमुळे युवकाचा जीव वाचला असून पुढील तपास सुरू आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/balaji-english-shache-talukat-ghavaghavit-yash/