मूर्तीजापूर तहसील कार्यालयावर काळा बैल पोळा आंदोलन

काळा बैल पोळा आंदोलन; मूर्तीजापूरात शेतकरी मोर्चा

अकोला : महाराष्ट्र सरकारच्या कृषीविषयक अपयशाचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे मूर्तीजापूर तहसील कार्यालयावर काळा बैल पोळा आणि धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे थेट मागण्या केल्या.

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या :

  • संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी

  • राज्यभर झालेल्या अतिवृष्टी व हवामानातील अस्थिरतेमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ₹५०,००० मदत

  • पीकविमा योजनेचे रद्द केलेले नियम रब्बी हंगाम २०२५ पर्यंत पूर्ववत करणे

  • २०२२ ते २०२४ दरम्यानचा थकीत पीकविमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे

  • कापूस व तूरला ₹१०,००० तर सोयाबीन व हरभऱ्याला ₹८,००० प्रति क्विंटल भाव जाहीर करणे

आंदोलनादरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला दिला.

Read also : https://ajinkyabharat.com/rotary-club-of-akottarf-balpoanimit-lampi-lasmization-and-arogya-shibir/