हिरपूरचा दुर्गेश तिहीलेचा स्टार्टअप ठरला पहिला

हिरपूरच्या सुपुत्राचा अभिमानास्पद पराक्रम

ग्रामीण पार्श्वभूमीतून राज्यात नाविन्यपूर्ण यश : हिरपूरचा दुर्गेश तिहीलेचा स्टार्टअप ठरला पहिला

 मूर्तीजापूर- हिरपूर येथील दुर्गेश वामन तिहीले या युवा विद्यार्थ्याने आपल्या अभिनव स्टार्टअप आयडियाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गावाचे नाव उज्ज्वल

केले आहे.अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,

लोहेगाव येथे नुकत्याच झालेल्या स्टेट लेव्हल स्टार्टअप आयडिया बूटकॅम्प २०२५ मध्ये दुर्गेशने ऑनलाइन मेड बुकिंग सेवा ही संकल्पना सादर केली होती.

महाराष्ट्रभरातून २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले असताना त्याची  आयडिया परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली .

ही संकल्पना घरकामासाठी मदतनीस (मेड) ऑनलाइन बुक करण्याची सोय उपलब्ध करून देणार असून सुरक्षितता, पारदर्शकता आणि सोयीसुविधा या अंगांनी ती वेगळी ठरली.

परीक्षकांनी या कल्पनेचे कौतुक करताना तिला समाजासाठी व्यवहार्य व तांत्रिक नावीन्यपूर्ण ठरवले.

विशेष म्हणजे, एका एंजेल इन्व्हेस्टर कंपनीने प्रोजेक्टच्या पुढील विकासासाठी गुंतवणुकीचे आश्वासन दिल्याने

दुर्गेशच्या स्टार्टअपला प्रत्यक्षात उतरवण्याची आणि रोजगारनिर्मितीची मोठी संधी मिळणार आहे.

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील दुर्गेशने आपल्या चिकाटी, जिद्द आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले.

त्याचे शिक्षक व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याच्या या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव केला.

Read also : https://ajinkyabharat.com/multijapur-mahamargawar-container-truck-truck-troop-jeevhani-tali/