रिसोड : रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोप येथे मानव विकास मिशन अंतर्गत २१ विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते
सायकलींचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समिती अध्यक्ष डाॅ. गोपीकिसन सिकची यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून अनिताताई सरनाईक, तसेच ज्येष्ठ संचालक जनार्दन नरवाडे, डाॅ. रामेश्वरजी नरवाडे, जुगलकिशोर शर्मा, स्नेहलताताई सिकची,
प्राचार्य संजाबराव देशमुख, मा. प्राचार्य प्रा. शरदकुमार टेमधरे, पर्यवेक्षक श्री. सुनील लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणमहर्षी ॲड. आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
प्रास्ताविक प्राचार्य प्रा. शरदकुमार टेमधरे यांनी केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनिताताई सरनाईक यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले व
विद्यार्थिनींना प्रेरणादायी उदाहरणे देत अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. गोपीकिसन सिकची यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पुंड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. समाधान गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Read also : https://ajinkyabharat.com/journalist-jhaleliya-bhyad-hrithyacha-voice-of-mediacdoon-prohibited/