बीडमध्ये बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह नाल्यात सापडला

मृतदेह

बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका होमगार्ड महिलेचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव आयोध्या राहुल व्हरकटे असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या.

माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आज दुपारच्या सुमारास त्यांच्या मृतदेह नाल्यात सापडल्याची माहिती मिळाली.

पोलीस घटनेचा तपास करत असून, ही हत्या आहे की आत्महत्या, याचा शोध घेत आहे.

घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/bhondubaba-maucha-karruta-hurting-nagpur-polis-action/