अकोटमध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम; छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर मोकळा

अकोट शहरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

अकोट – अकोट नगरपालिकेमार्फत शहरात अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू असून, याच अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण

हटविण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणे मोकळी होत आहेत आणि नागरिकांना

मोठा दिलासा मिळत आहे. पादचारी मार्ग, रस्ते व चौक यावर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला होता.

नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “शहरातील रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील कोणतेही बेकायदेशीर अतिक्रमण सहन केले जाणार

नाही.” तसेच पुढील काही दिवसांत शहरातील इतर भागांमध्येही अशीच कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

 नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/10-varshanantar-sonali-kharecha-kambok/