हैदराबाद हादरलं! – उद्या शिफ्ट होणार म्हणणाऱ्या कुटुंबाचा सामूहिक मृत्यू

घर बदलायचं होतं, पण मृत्यूने गाठलं!

हैदराबादमध्ये खळबळ: एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद मृत्यू

हैदराबाद : शहरातील महबूबपेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये पती, पत्नी, मुलगी, जावई आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

लक्ष्मैया (६०), व्यंकटम्मा (५५), अनिल (३२), कविता (२४) आणि पप्पू (२) अशी मृतांची नावे असून हे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे रहिवासी आहे.

गेल्या सहा वर्षांपासून ते हैदराबादमध्ये वास्तव्यास होते.

प्राथमिक तपासानुसार संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून,

सायबराबाद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मैया बांधकाम कामगार होते. अनिलदेखील बांधकाम क्षेत्रात मजुरी करत होता. आर्थिक संकट व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हा

टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेच्या एक दिवस आधी अनिलने मित्राला फोन करून गुरुवारी शिफ्ट होणार असल्याची माहिती दिली

होती.

पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/gst-rate-rate-motha-change/