GST रेटमध्ये मोठा बदल – 12% आणि 28% स्लॅब रद्द, फक्त दोनच करदर लागू
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (GST) दरात मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावाला GST दर तर्कसंगतकरणासाठी नियुक्त मंत्रिगटाने (GoM)
मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार 12% आणि 28% करस्लॅब रद्द करण्यात येणार असून, आता केवळ 5% आणि 18% हे दोनच स्लॅब लागू राहतील.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी 21 ऑगस्ट रोजी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय दरांमध्ये साधेपणा आणण्यासाठी घेण्यात आला आहे.
नवीन कररचना अंमलात आल्यानंतर देशातील वस्तू आणि सेवांवरील करप्रणाली अधिक सोपी आणि सुसंगत होईल, असे सांगण्यात आले.
या बदलामुळे ग्राहक आणि उद्योग क्षेत्रावर कसा परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.