अतिवृष्टी-ढगफुटीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
अकोट : तालुक्यातील ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, घरं व पशुधनाच्या नुकसानीसह जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतमालाचे, घरांची पडझड व पशुधनाच्या नुकसानीचे
तातडीने पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
आंबोडा येथील घराची भिंत कोसळून चिमुकली मुलगी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेवरही शासनाने तातडीने आर्थिक सहाय्य करावे,
अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली.या वेळी प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा, प्रदेश सचिव
काशिराम साबळे, महिला प्रदेश संघटक सचिव संध्या वाघोडे, जिल्हा संघटन सचिव संदीप कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राजेश भालतिलक
यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष सचिन शिंदे, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद अग्रवाल, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल इंगोले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष
ज्ञानेश्वर मानकर, युवक तालुकाध्यक्ष धीरज गिते आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल.
Read also : https://ajinkyabharat.com/bccicha-motha-plan-sumor/