श्रेयस अय्यरला टीम इंडियाचं कर्णधारपद? बीसीसीआयचा मोठा प्लॅन समोर!
मुंबई : आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून निवड समितीने केलेल्या घोषणेत मोठा बदल पाहायला मिळाला.
१५ सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा संधी न दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
परंतु, याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, बीसीसीआय श्रेयस अय्यरला भारताच्या वनडे संघाचं कर्णधारपद देण्याचा विचार करत आहे.
रोहित शर्मा सध्या वनडे कर्णधार असला तरी २०२७ च्या विश्वचषकापर्यंत तो खेळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहेत.
अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे श्रेयस अय्यर हा उत्तम पर्याय असल्याचं मानलं जात आहे.
शुभमन गिलकडे आधीच कसोटी व टी-20 जबाबदारी
सध्या कसोटी संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे असून टी-20 फॉरमॅटचं उपकर्णधारपदही त्याच्याकडेच आहे.
त्यामुळे त्याच्यावर अधिक भार न टाकता बीसीसीआय वनडे संघासाठी श्रेयस अय्यरला कर्णधार करण्याच्या तयारीत आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील
त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याचं नाव कर्णधारपदासाठी गंभीरपणे विचारात घेतलं जात आहे.
आशिया कप 2025 : भारताचा संघ
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा
भारताचे सामने (आशिया कप 2025)
१० सप्टेंबर : भारत विरुद्ध यूएई (दुबई)
१४ सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
१९ सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान (अबू धाबी)
श्रेयस अय्यरला खरोखरच २०२७ विश्वचषकापर्यंत वनडे संघाचं नेतृत्व मिळणार का, हे पाहणं आता क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/dainik-ajinkya-india-principal-shooter-santosh-tukaram-gayago-yancha-sadhod-dath/