1 कोटींचा दंड आणि 3 वर्ष जेल! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ऑनलाईन सट्टेबाजीवर होणार बंदी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील ऑनलाईन सट्टेबाजीवर मोठा दणका आणला आहे. लोकसभेत आज ऑनलाईन गेमिंगविषयक विधेयक मांडले गेले
आणि ते मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे ऑनलाईन पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या गेम्सवर आता कायमची बंदी बसणार आहे.
ऑनलाईन गेमिंगवरील चिंता
गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन सट्टेबाजी (Online Betting) भारतात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अनेक ऑनलाईन गेमिंग अॅप्सची जाहिरात लोकप्रिय
अभिनेत्यांकडून केली जात होती, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. या माध्यमातून अनेक जण आर्थिक फसवणूक आणि व्यसनाच्या
सापळ्यात अडकले. अनेकांचे कुटुंब या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाले असल्याने नागरिकांकडून या गेम्सवर बंदीची मागणी सातत्याने केली जात होती.
विधेयकाची प्रमुख माहिती
विधेयकाचे नाव: ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि विनियमन विधेयक 2025
उद्देश: ऑनलाईन मनी गेम्सवरील जाहिरात, बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाण आणि व्यसन रोखणे
कायदेशीर परिणाम: सर्व प्रकारच्या ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार बेकायदेशीर घोषित
समाविष्ट गेम्स: फँटसी गेम्स, पोकर, रम्मी, इतर कार्ड गेम्स, ऑनलाईन लॉटरी
शिक्षा आणि दंड
ऑनलाईन गेमिंग सेवा पुरवणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत कारावास
१ कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद
विधेयक पारितीची प्रक्रिया
लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ही कार्यवाही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. आता या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळणे बाकी आहे.
राज्यसभेतही मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक कायद्याच्या रूपात लागू होईल आणि त्यानंतर ऑनलाईन गेमिंग सेवा पुरवणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा लागू होईल.
उमेदवार आणि नागरिकांसाठी महत्त्व
या निर्णयामुळे ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीवर नियंत्रण येईल, आर्थिक फसवणूक कमी होईल आणि नागरिकांचे
कुटुंब आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित राहतील. केंद्र सरकारने नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घेत या विधेयकाची कल्पना मांडली असून, आता देशातील
ऑनलाइन मनी गेम्सवर कडक नियमन लागू होणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/15631-awaken-recruit/