भांबेरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
तेल्हारा (जि. अकोला) | 15 ऑगस्ट 2025 – तालुक्यातील ग्राम भांबेरी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
नायक पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष रक्षित बोदडे यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून
यावर्षीदेखील वही, पेन, दप्तर आदी साहित्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात
सकाळी 8 वाजता विश्वशांती बुद्ध विहार येथे महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, वीज उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, विवेक वर्धिनी विद्यामंदिर, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना
अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळे पार पडले.
“गोळ्या-बिस्किट नको, शालेय साहित्य द्या” – रक्षित बोदडे
कार्यक्रमात बोलताना रक्षित बोदडे म्हणाले,
“दरवर्षी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन, गणराज्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गोळ्या, बिस्कीट वाटतात.
परंतु गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन, दप्तर यांसारखे शैक्षणिक साहित्य दिल्यास त्यांचा खरा फायदा होतो.
त्यांच्या पालकांवरचा आर्थिक बोजा कमी होतो व विद्यार्थ्यांचा उत्साहही वाढतो. हा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे आणि पुढेही अखंड सुरू राहील.”
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी सरपंच मंगला इंगळे यांचे सहकार्य लाभले. तसेच शेख अजिम, धम्मदिप बोदडे, राजेंद्र तिहले, प्रदीप तायडे, मेहबूब शाह, साबीर पठाण, रहिम शाह, आमिन पठाण यांच्यासह
जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भांबेरी ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे शिक्षणप्रेमी वातावरणाला बळ मिळत असून विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/delhichaya-cmvar-suddenly/