गावठाणातील विद्युत रोहित्रामुळे ग्राहक त्रस्त

विद्युत रोहित्रांची अवस्था चिंताजनक

जांभोरा: गावठाणातील विद्युत रोहित्रामुळे ग्राहक त्रस्त; अधिकारी दुर्लक्ष

जांभोरा: जांभोरा गावातील घराघरांत विद्युतपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. गावातील विद्युत रोहित्र (डीपी) खराब अवस्थेत असल्यामुळे रहिवासी सतत त्रस्त आहेत.

स्थानिकांनी सांगितले की, डीपीला लागणारे केबल, फ्युज, फ्युज बॉक्स यांसारखे साहित्य अधिकारी पुरवत नाहीत.

त्यामुळे दररोज सकाळी, दुपारी आणि रात्री कितीही वेळा त गुल होत आहे. यामुळे ग्राहक दैनंदिन कामकाज,

पिके सिंचन आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यात अडचणीत आल्या  आहेत .

गावकांच्या तक्रारी असूनही अधिकारी वर्ग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.

जांभोरा गावातील सर्व विद्युत रोहित्रांची अवस्था अशीच चिंताजनक आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

ग्राहक म्हणतात, “सध्या परिस्थिती अतिशय गंभीर आहे, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना अपेक्षित आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/khatichaya-distribution-between-shetkayanwar-lathicharge/