ठाणेदार किशोर जुनघरे यांचा सत्कार

अमरावती विभागातील प्रथम क्रमांक

अकोट ग्रामीण पोलीस ठाणेदार किशोर जुनघरे यांचा सुपिनाथ महाराज शिव संस्थानकडून सत्कार

मुंडगाव (अकोट) – अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुपिनाथ महाराज शिव संस्थानचे अध्यक्ष गजानन वारकरी आणि

विश्वस्त मंडळाने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनने तालुक्याच्या ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले असून, महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत या

स्टेशनला अमरावती विभागातील प्रथम क्रमांक मिळाला. यासाठी किशोर जुनघरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर

अधिकारी व आमदारांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुंडगाव येथील संस्थानकडून सत्कार केल्याने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन आणि तालुक्याची मान उंचावल्याचे मानले जात आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/mangru-kambakade-janara-rasta-daya-avasthet/