मुर्तीजापूर – १६ ऑगस्ट रोजी मुर्तीजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी (दि.१८ ) क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली.
संघटनेने आज उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर केले. यामध्ये तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन जिल्हा संघटक राहुल वानखडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वानखडे म्हणाले की, “ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने आश्वासन न देता तातडीने दिलासा द्यावा, अन्यथा ग्रामीण भागात असंतोष निर्माण होईल.”
शेतकऱ्यांच्या या मागणीवर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/national-health-campaign-officer-karchayaancha-work-closed-agitation/