हर हर महादेवच्या गजरात कावड महोत्सव संपन्न

हर हर महादेवच्या गजरात कावड महोत्सव संपन्न

गांधीग्राम: गेल्या वर्षांच्या प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात शिवभक्त कावड पालख्या घेऊन गांधीग्राम येथे दाखल झाले.

शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराची पूजा श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने नदीचे पवित्र जल नेण्यासाठी आले होते.

संपूर्ण परिसर *”हर हर महादेव”*च्या गजराने दणदणाटले होते. नदीच्या परिसरात आणि घाटावर जिल्हा प्रशासन,

ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या वतीने लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता.

या कावड यात्रेत सेवाभावी लोकांकडून शिवभक्तांसाठी चहा, खिचडी, पाणी आणि भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच, जिल्हा परिषद अकोला व आरोग्य विभागाकडून येथील दवाखान्यात कॅम्पही सज्ज ठेवण्यात आला होता.

सदर कावड महोत्सवाची परंपरा ८१ वर्षांपासून चालत आहे. नदीच्या पात्रात जिल्हा आपत्तीकाळीन पथक बोटीसह सज्ज ठेवण्यात आले होते.

तसेच, संत गाडगेबाबा आपत्तीकाळीन पथक आणि पट्टीतील युवक बोटीसह नदीमध्ये तैनात होते.

Read also : https://ajinkyabharat.com/vidyarthayana-samjale-ingredients-danache-importance/