मुंबई – मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत रेड अलर्ट जारी केला असून पुढचे 4 तास अतिधोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.
काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून आज सकाळी भरदिवसा काळोख दाटून आला.
सर्वत्र पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दादर, वडाळा, कुर्ला, सायन परिसरात रूळ पाण्याखाली गेले आहेत.
प्रवासी रेल्वेत अडकले असून काही ठिकाणी रूळावरून पायी चालताना दिसत आहेत.
महापालिकेने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये व अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे.
वसई-विरार, नालासोपारा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत.
मुंबईकरांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/manika-vishwakarma-miss-universe-india-2025-winter/
