‘धुरंधर’ सेटवर सामूहिक विषबाधा

100 हून अधिक जण रुग्णालयात दाखल

रणवीरच्या ‘धुरंधर’ सेटवर 100 हून अधिक जण रुग्णालयात दाखल, सामूहिक विषबाधा

लेह (लडाख) – अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर’च्या सेटवर सामूहिक विषबाधा झाल्याने 100 हून अधिक कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

लेह-लडाखमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली.

माहितीनुसार, रविवारी चित्रपट युनिटमधील जवळपास 600 जणांनी जेवण घेतले होते. त्यानंतर अनेकांना पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.

ताबडतोब त्यांना सजल नारबू मेमोरियल (एसएनएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासानंतर हे प्रकरण सामूहिक विषबाधेचं असल्याचं सांगितलं आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विषबाधेचं कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने गोळा केले आहेत.

रुग्णालयात सर्व विभागांचे कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

या घटनेमुळे लेहसारख्या संवेदनशील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चित्रपटांचे शूटिंग करताना सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलीस अधिकारी अन्नाचे नमुने तपासून विषबाधेचे नेमके कारण शोधत आहेत.

सध्या युनिटने कोणत्या प्रकारचं अन्न व पाणी घेतलं आणि कोणत्या कलाकारांचा यात समावेश आहे, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read also :https://ajinkyabharat.com/asia-cup-2025-team-indiachi-declaration/