“टीम इंडिया हा सामना खेळणारच नाही.”

भारतीय संघ खेळणारच नाही, केदार जाधवां

 पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघ खेळणारच नाही, केदार जाधवांचा दावा

नवी दिल्ली : आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईत रंगणार होता. पण माजी क्रिकेटपटू व भाजप नेते केदार जाधव यांनी दावा केला आहे की, “टीम इंडिया हा सामना खेळणारच नाही.”

पहलगाम हल्ल्याचा परिणाम

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. याआधीही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत इंडिया

चॅम्पियन्सने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.

जाधवांचे वक्तव्य

“भारतीय संघ कुठेही खेळेल तर जिंकेल. पण पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळायला नको आणि खेळणारही नाही, हे मी खात्रीने सांगतो,” असे जाधव म्हणाले.

इतर खेळाडूंचा विरोध

  • हरभजन सिंह : “देशाचे जवान आधी, क्रिकेट नंतर.”

  • अजहरुद्दीन : “द्विपक्षीय मालिका नसेल तर ICC स्पर्धेतही खेळू नये. मात्र निर्णय सरकार-बीसीसीआयचा.”

पाकिस्तानचा संघ जाहीर

आशिया कपसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. त्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानला वगळले आहे.

पाकिस्तान स्क्वॉड (Asia Cup 2025):

सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक),

मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहबजादा फरहान, सैम अय्यूब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकिम.

 भारतीय संघाची घोषणा अद्याप बाकी असून भारत सामना खेळतो की बहिष्कार करतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/iphone-17-air-ho-shakato-jagatil-sarvat-paat-smartphone/