पोलिसांनी वेळीच पोहचून परिस्थिती आणली नियंत्रणात
अकोला – शहरात आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भव्य कावड पालखी महोत्सव सुरू आहे. अत्यंत शांत पूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या या कावड पालखी महोत्सवाला
काहींमुळे गालबोट लागले आहे शहरातील माळीपुरा चौकादरम्यान दोन मंडळात वाद होऊन मारहाणीची घटना घडली यादरम्यान लाठीकाठीने मारण्यात आले तर काहींनी हातात
मिळेल तो दगड घेऊन दगडफेक सुद्धा केली. यावेळी काही वेळा करिता तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मारहाणीची घटना पाहता यावेळी चांगलीच धावपळ उडाली. प्रत्येक जण
स्वतःला वाचविण्यासाठी धावताना दिसून आला. परंतु घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले यामध्ये काही जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. मारहाण करणारे कोण आहेत आणि हा वाद कशावरून झाला याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
पुढील कारवाई पोलीस करीत आहे.