दहिगाव गावंडे – परिसरात शनिवारी दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली.
काही मिनिटांच्या जोरदार पावसामुळे शेतशिवार अक्षरशः जलमय झाले असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
पळसो बढे, कौलखेड, जारामगाव, बाहिरखेड, धोतरडी, सांगळुड यांसह अनेक गावांच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद व कापूस या पिकांना पाण्याचा फटका बसला आहे.
शेतकरी वर्ग अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झाला असून, पिकांचे नुकसान लक्षात घेता शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करावी,
अशी जोरदार मागणी होत आहे.
अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने दहिगाव गावंडे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे.
प्रशासनाने तत्काळ परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/shivaji-sawantani-shiv-sena-sodli-bjp-entry-fixed/