शिवभक्त चौहटा बाजार मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद
देवरी -श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी चौहटा बाजार येथील शिवभक्तांनी २५ वर्षांची भोजनदानाची परंपरा कायम ठेवत भव्य प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.
स्थानिक मंडळाने बारा क्विंटल पोळी, १३ क्विंटल कवळ्याची भाजी व दोन क्विंटल स्वादिष्ट गुळाचा शिरा असा महाप्रसाद
अकोला व पूर्णा नदीवरून जल घेऊन जाणाऱ्या हजारो शिवभक्तांना वाटप केला.
या उपक्रमाची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी ५० किलो पोळी व कवळ्याच्या भाजीपासून झाली होती.
आज हा उपक्रम शेकडो क्विंटलच्या प्रमाणात वाढला असून मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अध्यक्ष किंवा सदस्य अशी पदसंरचना नाही.
सर्व शिवभक्त एकजुटीने व प्रामाणिकपणे कार्य करतात.
प्रसादाच्या वाटपाकरिता मंडळाचे कार्यकर्ते दोन गाड्यांमध्ये प्रसाद भरून गांधीग्राम येथे रात्रभर श्रम करतात.
या अनोख्या सेवाभावी उपक्रमात रमेश वानखडे, मोहन पवार, चेतन दिया, सुभाष राठी, दादाराव ढगे, सुरेश जवाळ, गोपाल तांदळे, गजानन पतिगे, राजेश शेगोकार, अनिल अंबरे, सुलेमान शहा, संतोष डांगरे, महाराज भरणे, राजू वडाळ, सुनील एके, दिलीप अंभरे, निखिल जोशी, गोलू वाकोडे यांसह चौहटा बाजार येथील सर्व शिवभक्तांनी मोलाचे योगदान दिले.
या शिवभोजन उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ही सेवा खरी ‘भक्ती’ मानली जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akotamadhye-bhumi-foundationcha-historical-program-venual/