चिखली -तालुक्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गावांचा संपर्क तुटला आहे.
त्यामुळे परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये या अनुषंगाने चिखली तहसीलचे तहसीलदार संतोष काकडे यांनी दोन दिवस 18 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट
रोजी शाळा महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे.
चिखली तालुक्यात गेली तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
चिखली ते बुलडाणा रोड दोन्ही बाजूनी बंद झाला आहे. यात पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे बघायला मिळत आहे.
अशात खेड्या पाड्यातून शहरामध्ये येणारे रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहे ठिकठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सावधगिरी
म्हणून दोन दिवस शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
तसेच चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे की, अशा कठीण प्रसंगात आपण सर्वांनी जात,
धर्म,पंथ, पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरायचे आहे, आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या
भागातील नागरिकांची तन-मन धनाने शक्य होईल ती मदत करायची आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/popatkhed-yehe-tabbal-10-ft-foot-python/