पैनगंगा नदीच्या पुरात वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पैनगंगा नदीच्या पुरात वाढ -प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

मेहकर – तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प 84.38 टक्के क्षमतेने भरल्यानं आणि सतत आवक सुरू राहिल्यानं

धरणाचे 9 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल 9 हजार 689 क्युसेक पाणी पैनगंगा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे.

धरण व्यवस्थापनाची माहिती

धरणात पाण्याची सतत आवक होत असल्याने विसर्गात वाढ किंवा घट करण्याची कार्यवाही परिस्थितीनुसार केली जाणार आहे.

त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचा इशारा

प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकिनारी जाणे टाळावे, अनावश्यक धोका घेऊ नये,

तसेच प्रशासनाशी संपर्क ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 पैनगंगा नदीलगतच्या गावांमध्ये पुरस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/qurankhed-tantamukti-chairman/