शुभम कार्ड शोरूम जळून खाक
अकोला │ प्रतिनिधी
अकोल्यातील जुन्या कॉटन मार्केट भागात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.
शुभम कार्ड या होलसेल ग्रीटिंग आणि लग्नपत्रिका बनवणाऱ्या शोरूमला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे.
शटर तोडून आग विझवण्याचा प्रयत्न
मध्यरात्री दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल चार गाड्या दाखल
झाल्या. दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
सुदैवाने आग पसरली नाही
दुकानातील ग्रीटिंग कार्ड, लग्नपत्रिका व सजावटीच्या वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या. मात्र सुदैवाने आग इतर शेजारील दुकानांपर्यंत पसरली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस व अग्निशमन विभाग याबाबत तपास करत आहेत.
या घटनेनंतर जुन्या कॉटन मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akola-yethil-kavad-yatra-hari-ajrati-15-jakhmi-ekchi-prakriti-gambhir/