अकोला येथील  कावड यात्रेत भीषण अपघात – १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर

अकोला येथील  कावड यात्रेत भीषण अपघात

अकोला  – कावड यात्रेत सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. डाबकी रोड-वाशी मार्गावर कावडी घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन

तब्बल १५ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पूर्णा नदीचे जल आणण्यासाठी निघालेली ही कावड शहरातील सर्वात मोठी मानली जाते.

मात्र, ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले आणि त्यात मागे बसलेले अनेक शिवभक्त जखमी झाले.

घटनास्थळी शिवभक्तांचा मोठा जमाव

अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या शिवभक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

काहींची नावे व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, घटनेने वातावरणात खळबळ उडाली आहे.

जखमींची प्रकृती स्थिर

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

गंभीर जखमी असलेल्या एका भाविकावर विशेष उपचार सुरू आहेत.

राजकीय नेत्यांची रुग्णालयात धाव

या अपघातानंतर काही राजकीय नेत्यांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली व जखमींची विचारपूस केली.

दरम्यान, कावड महोत्सवाला पहिल्यांदाच असे गालबोट लागल्याची चर्चा

नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/gharachi-bhabint-padun-chimukalya-sharavicha-durchaivi-dishyu/