घराची भिंत पडून चिमुकल्या शरविचा दुर्दैवी मृत्यू

घराची भिंत पडून चिमुकल्या शरविचा दुर्दैवी मृत्यू

अंबोडा गावात घराची भिंत पडून चिमुकली शरवीचा मृत्यू – गावात शोककळा

अकोट – तालुक्यातील अंबोडा (वार्ड क्र. २) येथे रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मजुरी करून उदरनिर्वाह करणारे प्रवीण प्रकाश शिरसाट

यांच्या राहत्या घराची मुख्य भिंत अचानक कोसळली. त्यावेळी घरासमोर खेळत असलेली त्यांची चिमुकली मुलगी शरवी ही ढिगाऱ्याखाली दबली जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली.

शरवीला तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

🔹 प्रशासनाची तात्काळ दखल

घटनास्थळी पटवारी संदीप देऊळकर, आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार

ठोसरे मेजर यांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/mother/