छोट्या एसआयपीची मोठी कमाल : दररोज फक्त 100 रुपयांत निवृत्तीनंतर कोट्यवधी रुपयांचा फंड!
नवी दिल्ली :गुंतवणुकीच्या जगात म्युच्युअल फंडातील एसआयपी (Systematic Investment Plan) हा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो.
विशेष म्हणजे, फार मोठी रक्कम न गुंतवता फक्त दररोज 100 रुपये (म्हणजे महिन्याला 3000 रुपये) गुंतवले तरी,
दीर्घकालीन गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.
कंपाऊंडिंगचा फायदा – गुंतवणूक जितक्या लवकर सुरु केली जाते तितका गुंतवणूकदारांना फायदा होतो.
उदाहरणार्थ, जर एखादा तरुण वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 3000 रुपये एसआयपी सुरु करतो आणि ती 35 वर्षे कायम ठेवतो,
तर त्याला निवृत्तीनंतर तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त निधी मिळू शकतो.
स्टेप-अप एसआयपीने जास्त फायदा- फायनान्शियल तज्ज्ञांच्या मते, एसआयपी सुरु केल्यानंतर दरवर्षी 5 ते 10 टक्के रक्कम वाढवत (स्टेप-अप) नेल्यास कोट्यवधींचा कॉर्पस तयार होतो.
उदा. 25 व्या वर्षी सुरु केलेली 3000 रुपयांची एसआयपी, दरवर्षी 5% वाढवत नेल्यास 35 वर्षांत 32 लाखांची गुंतवणूक करून 5.7 कोटींचा फंड तयार होतो.
नियमित बचतीतून मोठा फंड
एसआयपीतून दरमहा ठराविक रक्कम ऑटो-डेबिटद्वारे फंडात जमा केली जाते. जितकी दीर्घकाळ गुंतवणूक असेल तितका जास्त फायदा मिळतो.
शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून कोणताही गुंतवणूक सल्ला नाही.
गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Read also : https://ajinkyabharat.com/nivadnuk-commission-lokshicha-khoon-kartoy-jitendra-awhad/