चौहटा – तळागाळातील जनतेच्या सेवेमध्ये समर्पित असलेले सेवा संघाच्या वतीने प्रथम सर्व थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
वध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तेव्हा गावातील सरपंच नंदूभाऊ राणे यांच्या वतीने सेवा संघाचा ध्वज फडकविण्यात आला.
संस्थेचे सदस्य नंदकिशोरराने व भारत माता क्रांती आश्रमाचे अध्यक्ष डॉ.शंकरराव राजू सांगळे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
सर्व उपस्थितांमध्ये भारत देशाच्या संरक्षणासाठी त्याग करणाऱ्याचे सर्व देशभक्ती विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व थोर महापुरुषांना सर्वांनी अभिवादन केले. जे वीर जवान भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देऊन अजरामर झाले अशा देशभक्तांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले…
तेव्हा देशभक्ती सेवा संघाच्या सदस्य सचिव श्री गोपाल वावरे यांनी देशभक्ती विषयाचे महत्त्व पटवून दिले.
तसेच आसरा देशभक्ती सेवा संघाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई वावरे यांनी देशाकरता ज्यांनी बलिदान केले अशा वीर जवानांन बाबत मनोगत व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रामुख्याने मोहन शंकरावजी बुदें , नंदकिशोर राणे व परिसरातील सर्व लहान बालकासह प्रामुख्याने ध्वजारोहणाच्या
कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आशाताई वावरे, गोपाल वावरे ,माणिकराव डांगरे, विनायक वडतकार ,सुनील बुटे ,विकास वानखडे, बाबाराव अंकुरकार.
शीलाताई डागरे, नंदाताई भांडे ,सुभाष टाकसाळे ,मंदा टाकसाळे, अक्षय वारे, सरलाताई पेठे, रूपालीताई एकिरे, अमर वासनिक, सुभाष गवार ग्रुप इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/diligar-chori-charge-nivadnuk-commission-explanation/