महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न

महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न

गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न

गांधीग्राम :- महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम येथील प्राचार्य प्रफुल्ल डोंगरे  यांच्या मार्गदर्शनाखाली १५ आगस्ट रोजी

‘ध्वजारोहण’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सवानिमित्त’ हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत कवायतीच्या संचालनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी आज सकाळी ७:३० वाजता महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.मालतीताई काठोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर लगेच राष्ट्रगीत, राज्यगीत आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.

त्यानंतर तंबाखू आणि धुम्रपान मुक्त भारत करण्याची शपथ विद्यार्थ्यांना व उपस्थितांना देण्यात आली.

सदर ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य विलासजी झामरे, उपाध्यक्ष संजय इंगळे

सहसचिव डॉ शरद काठोळे, संचालिका सौ. जयश्रीताई इंगळे, प्राचार्य प्रफुल्ल डोंगरे, शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि गांधीग्राम येथील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.

शासकीय आदेशानुसार हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला गांधीग्रामचे प्रतिष्ठित नागरिक डिगांबर पाटील काठोळे, माजी सरपंच कैलास सदांशिव, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते अतूल काठोळे,

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत फुरसुले व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी पोलीस पाटील गजाननराव ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ किरण ठाकरे, संजय माजरे,

शरद वाघोलीकर व इतर बहुसंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ विजय चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन अनिल मैघने यांनी केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रा जगन्नाथ बरडे, अतुल फोकमारे, ज्येष्ठ शिक्षिका सरिता ठाकुर, ममता खुमकर प्रकाश पाटणकर, अनिल राउत, राजू वाटमारे, विवेक नहाटे,अजिंक्य ठोंगे,

मोक्षदा ईंगोले, देवश्री हीरुडकर, श्याम मोहोड इत्यादी शिक्षक, तर संदिप ओहेकर, मनिषा तळोकर, रमेश झाडे,नारायण बावणे, गणेश कुले, इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी,

पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/jambhora-gavatil-talav-footla-shetkayancha-millions-of-damage/