अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान
अकोट : अकोट ग्रामीण भागात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत उत्कृष्ट कामगिरी करणारे
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान १५ ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अव्वल
राज्यातील विविध विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत
राज्यातील तब्बल १२,५०० शासकीय कार्यालयांचा सहभाग होता.
या मोहिमेत अमरावती विभागातील ‘पोलीस स्टेशन’ या गटातून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकाने निवडले गेले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहीचे सन्मानपत्र
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे सन्मानपत्र देण्यात आले.
जिल्ह्याचा अभिमान
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतल्याने ठाणेदार किशोर जुनघरे यांना मिळालेला हा सन्मान
अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्याचा मान उंचावणारा ठरला आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/shravanatil-last-somwari-rajarajeshwar-jalabhishekasathi-adhi/