श्रावणातील अंतिम सोमवारी राजराजेश्वर जलाभिषेकासाठी अडचण

पूर्णा नदीला पूर – शिवलिंगापर्यंत पोहोचले पाणी

पूर्णा नदीला पूर – शिवलिंगापर्यंत पोहोचले पाणी

श्रावणातील अंतिम सोमवारी राजराजेश्वर जलाभिषेकासाठी अडचण

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गांधीग्राम परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला आहे.

यामुळे नदीचे पाणी थेट शिवलिंगापर्यंत पोहोचले असून, श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी राजराजेश्वर मंदिरासाठी

जलाभिषेकाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक पालखी व कावड उत्सवाच्या माध्यमातून पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन राजराजेश्वराचा जलाभिषेक करतात.

अंतिम सोमवारी तर भाविकांची प्रचंड गर्दी होते. रविवारी रात्रीपर्यंत हजारो शिवभक्त नदीकाठी जमले होते.

भाविकांच्या सुरक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.

मात्र, नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारीही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाघोली भागात पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शिवभक्तांनी नदीतून जल घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/spice-jet-pravashansathi-banle-dokedukhi-2/