तब्बल सहा तास प्रवाशांना राहावे लागले तात्कळत
मुंबई ते दुबई जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला त्रास
मुंबई: स्पाइस जेट ची सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. या स्पाइस जेट सेवेमुळे प्रवाशांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे ही कंपनी प्रवाशांना चांगली सुविधा देत असल्याचे सांगत असली तरी अनेक वेळा तांत्रिक बिघाडासह विविध समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
15 ऑगस्ट रोजी स्पाइस जेटचे विमान SG-13 हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 11:15 मिनिटांनी दुबई साठी उड्डाण घेणार होते.
परंतु दीड तास उशिराने या विमानाने मुंबई ते दुबई कडे जाण्यासाठी टेकऑफ केले.
आधीच दीड तास उशिराने टेक ऑफ झालेल्या स्पाइस जेट विमानात एका तासानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पुन्हा हे विमान मुंबईमध्ये परतले यादरम्यान मुंबई विमानतळावर लँड करण्यासाठी
परवानगी मागण्यात आली.
परंतु मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या विमानाला लँड करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.
त्यानंतर हे विमान अहमदाबाद मध्ये 16 ऑगस्टला सकाळी 4 :16 मिनिटाने पोहोचले.
या ठिकाणी विमानतळावर लँड झाल्यानंतर प्रवाशांना या ठिकाणी सुद्धा असुविधेचा सामना करावा लागला.
या विमानामध्ये जवळपास 170 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.त्यामध्ये काही कुटुंब लहान मुले सुद्धा होती.
अहमदाबाद येथील विमानतळावर पुन्हा प्रवाशांना खाली उतरून चेकिंग करण्यात आली. साधे पाण्यासाठी सुद्धा कोणी विचारणा केली नाही.
रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारे हे स्पाइस जेट विमान तब्बल सहा तास उलटून सुद्धा दुबई कडे रवाना झाले नव्हते.
या सहा तासात प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर दुसऱ्या विमानात बसवून प्रवाशांना 16 ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजता दुबई कडे रवाना करण्यात आले.
दुबई ला जाणारे अनेक प्रवासी आपल्या कंपनीच्या कामांसाठी किंवा इतर खाजगी कामांसाठी जात असतात प्रत्येक प्रवासाचा हेतू असतो की वेळेवर पोहोचून आपली कामे करावी.
परंतु स्पाइस जेट कंपनी द्वारे अनेक वेळा अशा पद्धतीचे अडचणी आणून प्रवाशांना त्रास दिल्या जात आहे याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही तर एखाद्या वेळी मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/scorpio-zodiac-scorpio-rashichya-jatakanchi-is-easy-to-complete/