पुराच्या पाण्यात वाहून वयोवृद्धाचा मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून वयोवृद्धाचा मृत्यू

रिसोड – रिसोड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.

याच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वाडी रायताळ येथील पिराजी किसन गवळी (वय ६९) हे शेतात कामासाठी गेले होते.

मात्र १५ ऑगस्ट रोजी ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी (१६ ऑगस्ट) त्यांचा मृतदेह खालतलची नदी (स्थानिक नाव) येथील पुराच्या पाण्यात आढळून आला.

मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

सततच्या पावसामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात जाण्याचे टाळावे असा इशारा दिला आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/umarkhed-talukayatil-many-village/