स्वातंत्र्यदिनानिमित्त अमली पदार्थ जनजागृती रॅली
पिंजर – ज्ञानप्रकाश विद्यालय आणि पिंजर पोलीस स्टेशनचा संयुक्त उपक्रम
१५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन उडान” अंतर्गत अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेला प्रतिसाद देत ज्ञानप्रकाश विद्यालय आणि पिंजर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंजर येथे जनजागृती रॅली काढण्यात आली.
शेकडो विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत गावकऱ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
या प्रसंगी ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ मुक्तीची शपथ घेतली. रॅलीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/kambi-mahagava-yehe-achtantrya-date-sajra/