स्वातंत्र्यदिनादिवशी धुळे जिल्ह्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीचे हॉटेल संतप्त नागरिकांनी फोडले
धुळे : शिरपूर तालुक्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (15 ऑगस्ट) 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली.
आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी शिरपूर साखर कारखान्यासमोर असलेल्या आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास केला असून उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पाहणी केली.
या घटनेनंतर तालुक्यात संतापाचे वातावरण असून आरोपीवर फास्टट्रॅक कोर्टात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोल्हापुरात तरुणीची आत्महत्या : बसमधील त्रासाला कंटाळून घेतला गळफास
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील किणी येथे एका महाविद्यालयीन तरुणीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
बसमध्ये सतत छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या त्रासामुळे तिने घरात कोणी नसताना गळफास घेतला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून तरुणीला श्रद्धांजली वाहिली आणि न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात दाखल केले असून पेठवडगाव पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एका बाजूला धुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील तरुणीची आत्महत्या
या घटनांनी समाज हादरला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/shubman-gilla-sangatun-davlalm-janar/