रिसोड तालुक्यात तिसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस

रिसोड तालुक्यात तिसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस

रिसोड तालुक्यात तिसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

रिसोड (जि. वाशीम) – रिसोड तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला आहे.

शेलुखडसे, भरजाहगीर, वाकद व रिसोड परिसरात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेती पिकांसह ठिबक सिंचन, फिल्टर, पाईप आदी शेती साहित्य वाहून गेले आहे.

मागील महिन्यात तिसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि हळद पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सुपीक माती खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे.

आधीच बियाणे, खते व मशागत यावर खर्च झालेला असताना या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

“माझी दोन एकर हळद संपूर्ण पाण्याखाली गेली आहे. ठिबकचे पाईप, फिल्टर वाहून गेले. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने हळद लावली होती,

पण नैसर्गिक संकटानं तीही भुईसपाट झाली. कर्जाचा डोंगर वाढला आहे. सरकारने तातडीने मदत करावी,”

 – माधव पंजाबराव खडसे, शेतकरी, शेलुखडसे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/shetkayala-maralam-aani-tumhi-tya-netayachi-punha-appointment-ahat-rohit-pawar/