‘शेतकऱ्याला मारलं आणि तुम्ही ‘त्या’ नेत्याची पुन्हा नियुक्ती करत आहात’- रोहित पवार

रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल

‘शेतकऱ्याला मारलं आणि तुम्ही ‘त्या’ नेत्याची पुन्हा नियुक्ती करत आहात’ – रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल

सांगली : रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणारे सूरज चव्हाण यांचे महिन्याभरातच राजकीय पुनर्वसन करण्यात आले.

युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

यावरून आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना सवाल केला – “कुठलीही नियुक्ती करायला हरकत नाही, पण शेतकऱ्याला मारलं आणि त्याच व्यक्तीला पुन्हा नेमणूक करता?

आम्ही हे दादांच्या काळजीपोटी बोललो, टीका म्हणून नव्हे.”

इस्लामपूरमधील अजित पवारांच्या भाषणावर रोहित पवार म्हणाले – “दादांनी टेस्ट, 50 ओव्हर्सची मॅच खेळली; पण आताचा काळ टी20 चा आहे.

आम्ही नवीन पिढी प्रामाणिकपणे मैदानात लढत आहोत. आमच्याकडे दिग्गज नेते आहेत आणि जनता प्रतिसादही देते.”

ईव्हीएमवर टीका करताना रोहित पवार म्हणाले – “बॅलेटवर आम्ही जिंकतो, पण ईव्हीएममध्ये घोटाळा होतो. तरीसुद्धा मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे.

पुढील पाच वर्ष सरकारला धडकी भरवणार.”

भाजपवर टीका करताना ते म्हणाले – “काही नवे आमदार हे खोट्या सोन्यासारखे आहेत.

चंद्रकांत पाटील हे मात्र भाजप-आरएसएसशी प्रामाणिक राहिले आहेत, त्यांना विनंती आहे की या बेन्टेक्स सोन्याला सांभाळा.”

READ ALSO :https://ajinkyabharat.com/vidanchal-the-school-yehe-swatantra-dinacha-dimakhdar-soha/