सत्ता आली गेली पण एनडींनी कधी उडी मारली नाही; जयंत पाटलांचं रोखठोक भाष्य
सांगली – “मी प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांचा प्रचंड आदर करतो. कारण या माणसाने कधीच विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी विचार बदले नाहीत, कधी भूमिका बदलल्या नाहीत.
सत्ता आली-गेली, पण एन. डी. पाटलांनी कधी इकडून तिकडे उडी मारलेली ऐकली आहे का? नाही म्हणजे नाही!
या माणसाचं महात्म्य त्यातच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एन. डी. पाटलांच्या भूमिकेचं कौतुक केलं.
Related News
सांगली येथे प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालय – संशोधन केंद्र व बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सरोजा पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “वाळवा हा स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. सहजा सहजी वाकत नाही, घाबरत नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने जगतात.
हे शिकवणारे एन. डी. पाटील साहेबच आहेत. कायदाचं पालन ही वेगळी गोष्ट आहे, पण न्याय मिळवणं आता कठीण झालं आहे.”
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हलकंसं टोमणे मारले. ते म्हणाले, “अजितदादा आता गावकीचा विचार करतात, पण भाविकाला विसरले.
मंत्रीपद गेलं तरी काही जण बंगला सोडत नाहीत. त्यांनी एन. डी. पाटलांच्याकडून आदर्श घ्यायला हवा. जयंत पाटील, स्व. आर. आर. पाटील, स्व. पतंगराव कदम यांनी सांगलीच्या विकासाचा विचार केला.
चंद्रकांतदादा भाजपचे असले तरी खरे सोने आहेत. पण आज काही बेनटेक्सचे सोने खालच्या थराला जाऊन बोलत आहे. भाजपमधील खऱ्या सोन्याची दखल घेण्याची वेळ आली आहे.”
कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, “माझा नंबर भाषणात नेहमी शेवटी लागतो.
सरोजा ताई पाटील फक्त शरद पवार यांच्या बहिणी किंवा एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही. त्या स्वतः कर्तृत्ववान आहेत.
मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही.”
संपूर्ण कार्यक्रमाला एन. डी. पाटील यांचं तत्त्वनिष्ठ आणि अढळ विचारसरणीचं महात्म्य अधोरेखित झालं.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/kanya-rashi-today-tumche-you-family-family-centered-raheel/