जिल्हा परिषद शाळा पुंडा येथे दहीहंडी उत्सव जल्लोषात
पुंडा-जिल्हा परिषद शाळा पुंडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णांच्या वेशभूषेत नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या सादरीकरणानंतर दहीहंडी फोडून कार्यक्रमाला उत्साहाचा उच्चांक गाठण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय पडघामोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नयनाताई फुंडकर,
सहायक शिक्षक निवृत्ती आवारे, श्री. पेढेकर, कर्मचारी मदन पंजाबराव कुलट, कुलदिप वानखेडे, धन्न नितीन पाठक, अभिषेक देवळे, गौरव लोदे,
गजानन साबळे, गणेश नागोराव कुलट, सचिन पाठक, मंगेश कोथळकर, अंगणवाडी सेविका प्रतिभा आढे, मदतनीस वर्षा पुंडकर, लता थप्पण, कॉन्व्हेंट शिक्षिका कल्पना पुंडकर, लक्ष्मी कुलट आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची जाण, परंपरेचे महत्त्व आणि सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/sarvadharma-mitra-mandalala-jilha-objection-administration-authority/