‘सर्वधर्म मित्र मंडळा’ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सन्मान

‘सर्वधर्म मित्र मंडळा’ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सन्मान

कारंजा लाडच्या ‘सर्वधर्म मित्र मंडळा’ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सन्मान

प्रतिनिधी | कारंजा लाड

नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती प्रसंगी जीव वाचविण्यासाठी धाडसाने पुढे सरसावणाऱ्या ‘सर्वधर्म मित्र मंडळ, कारंजा लाड’ या संस्थेच्या शोध

व बचाव पथकाला सन २०२४-२५ मधील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान समारंभ राज्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई, तसेच कर्तव्य सेवक अजय ढोक, दीपक सोनवणे, पवन जी. मिश्रा यांना स्मृतीचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

समारंभाला जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वास घुगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांसह मान्यवर उपस्थित होते.

गेल्या सोळा वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेले ‘वन सेकंड वन कॉल – न्यू लाइफ अभियान’ या सास कंट्रोल रूम उपक्रमांतर्गत मंडळाने

अनेक जीव वाचविण्याच्या मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या आहेत. या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्तरावर संस्थेचे सातत्याने कौतुक होत आहे.

सर्वधर्म मित्र मंडळाने दाखवलेली तत्परता, शिस्तबद्ध कार्यप्रणाली व सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या सन्मानामुळे संस्थेची प्रतिष्ठा अधिक उज्वल झाली आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/akola-polisanche-mission-udan/