अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी तीन किमी धावस्पर्धेत हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग
अकोला : अमली पदार्थाच्या विळख्यातून युवकांना मुक्त करण्यासाठी अकोला पोलिसांकडून ‘मिशन उडान’ अंतर्गत तीन किलोमीटर खुल्या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘ड्रग्ज मुक्त भारत’ या उद्दिष्टाला बळकटी मिळावी, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या संकल्पनेतून ही धाव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात अकोल्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि पोलीस कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.
शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नागरिकांनी “नशामुक्त भारत”, “ड्रग्जला नकार – आरोग्यदायी जीवन स्वीकार” अशा घोषणा दिल्या.
त्यामुळे शहरभर अमली पदार्थविरोधी जनजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचला.
या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत असून, युवकांमध्ये नशामुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/