अकोला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क, खडकी, अकोला येथे ७९ वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नाटिका सादर करून देशप्रेमाचा संदेश दिला.
‘आकांक्षा’ या नाटिकेत स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
या सोहळ्यात बी.ए. एस.डब्ल्यू. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभाचे वितरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन नियमित तासिकांना हजेरी लावण्याचे व ग्रंथालयात अभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी सांगितले की, “स्वातंत्र्य हे अनेक बलिदान, संघर्ष व हालअपेष्टा सोसून मिळवले आहे. एकदा गमावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळवणे कठीण असते, त्यामुळे त्याचे जतन करण्यासाठी जिवापाड प्रयत्न करणे आवश्यक आहे.”