पावसातही तिरंग्याचा मान; काँग्रेस मुख्यालयात राहुल-खरगे यांचे ध्वजारोहण

लाल किल्ल्यावर गैरहजेरी

स्वातंत्र्यदिन विशेष

लाल किल्ल्यावर गैरहजेरी; काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी व खरगे यांचा ध्वजारोहण सोहळा

नवी दिल्ली | 

देशभरात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी

यंदा लाल किल्ल्यावर आयोजित राष्ट्रीय सोहळ्याला हजेरी लावली नाही. मात्र, त्यांनी पावसातही काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवत स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

यावर्षी काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहण विशेष ठरले. तिरंगा इतक्या उंचीवर बांधण्यात आला होता की तो रिमोटद्वारे फडकवण्यात आला.

या सोहळ्यासाठी पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. पावसाच्या सरींमध्ये छत्रीशिवाय उभे राहून राहुल गांधींनी सहभाग घेतला.

ध्वजारोहणानंतर राहुल गांधींनी ‘एक्स’वर लिहिले – “सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य, सत्य आणि समानतेच्या पायावर न्याय आधारित भारत निर्माण करण्याचा संकल्प आहे.

प्रत्येक हृदयात आदर आणि बंधुता असली पाहिजे. या मौल्यवान वारशाचा अभिमान आणि सन्मान जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत.”

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही शुभेच्छा देत लिहिले – “आमच्या लाखो वीरांनी असंख्य बलिदान देऊन आम्हाला स्वातंत्र्य दिले. त्यांनी दिलेला लोकशाही, न्याय आणि समानतेचा संकल्प जपण्याचा आमचा निर्धार कायम आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले. अनेक शाळा, सरकारी संस्था व संघटनांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लाल किल्ल्यावर राहुल गांधी व खरगे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आसन व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर राहुल गांधींनी यंदा हजेरी लावली नसल्याची शक्यता व्यक्त होते.

तरीही, दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावरून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प व्यक्त केला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/shaktipeeth-mahamargawarun-vaat-tapala/