“शक्तिपीठ महामार्गावरून वाद तापला

शक्तिपीठ महामार्गावरून वाद तापला

शक्तिपीठ महामार्ग : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू — चंद्रकांत पाटील

सांगली – “राज्यात सध्या काही झालं की सरकार अस्थिर करण्याचा आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काही शक्ती मुद्दाम अशा हालचाली करत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो,” असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केले.

सांगलीत आयोजित झेंडावंदन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना ते शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावर प्रतिक्रिया देत होते.

पाटील म्हणाले, “कोयना धरण नसतं झालं तर आज महाराष्ट्राची वीज आणि शेती पाण्यावाचून राहिली असती. समृद्धी महामार्ग नसता तर नागपूरहून मुंबईला आठ तासात शेतमाल पोहोचला असता का?”

शेतकऱ्यांना आवाहन

शक्तिपीठ महामार्ग हा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्वाचा प्रकल्प आहे. बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई व पुनर्वसन मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील.

त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध न करता भरपाई कशी जास्त मिळेल यावर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महामार्गाचे संपादन

शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार असून, 371 गावांमधील एकूण 8024 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

यापैकी 7625 हेक्टर खाजगी (शेतकऱ्यांची) जमीन, 262 हेक्टर शासकीय जमीन आणि 123 हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे.

सध्या वर्धा, यवतमाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे, तर सोलापूरमध्ये ती समाधानकारक गतीने सुरू आहे.

मात्र, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यांत मोजणी मंदावली आहे, आणि लातूर, सांगली, कोल्हापूरमध्ये तीव्र विरोधामुळे प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

सरकारने अद्याप जमिनीसाठी मोबदल्याचे सूत्र जाहीर केलेले नाही.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/come-rashiyat-whatsapp-aani-telegram-callswar/